तेल्हारा (प्रतिनिधी)- काल रात्री झालेल्या विजेच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे तेल्हारा तालुक्यात शेतीसह घरांची पडझळ झाल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर अस्मानी संकटांचा कहर तुटून पडला आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये पावसाच्या पाण्याने हाहाकार केल्याने बऱ्याच नागरिकांच्या घरात गुडघ्याभर पाणी साचल्याने तसेच घरांच्या भिंती पडल्याने अतोनात नुकसान झाले असून शेतकऱयांची सुद्धा बिकट परिस्तिथी झाली आहे. कालच्या पाण्याने शेतीमध्ये पाणी साचल्याने, पिके खरडून, वाहून गेल्याने शेतकऱयांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागले आहे. कारण तोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक विवनचनेत सापडला आहे. शासनाने त्वरित नुकसान ग्रस्त शेती घरांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.