• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज होणार निवडणुकीच्या तारखा जाहीर! निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
निवडणूक आयोग

निवडणूक आयोग

11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकांच्या वेळी 12 सप्टेंबर रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने सगळ्यांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागून राहिल्या होत्या. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. नेमकं या निवडणुकीतील मतदान दिवाळीपूर्वी होतील का दिवाळीनंतर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचाराला वेग आला आहे. शिवसेना-भाजपा युती काही दिवसांत घोषित होईल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आघाडीत प्रत्येकी 125 जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार आहे. शिवसेना-भाजपा युतीमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेला 120 जागा सोडाव्यात असा प्रस्ताव भाजपाचा होता मात्र हा प्रस्ताव शिवसेनेने अमान्य केला असल्याने आणखी काही जागा वाढवून देण्याची भाजपाने तयारी दर्शविली आहे.

निवडणुका घोषित झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल. मात्र आचारसंहितेपूर्वीच भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून राज्यभरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा आणि राष्ट्रवादीकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे 20-25 ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल असं बोललं जात होतं. मात्र आठवडा झाला तरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. शुक्रवारी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. त्यामुळे आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: झारखंडनिवडणूक आयोगमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकविधानसभा २०१९विधानसभा निवडणुकहरियाणा
Previous Post

लोकजागर मंच ने स्वीकारली तेल्हाऱ्यातील बहीण-भावाच्या शिक्षणाची जबाबदारी

Next Post

ब्रेकिंग: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ! २१ ऑक्टोबरला मतदान २४ ला निकाल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
निवडणूक आयोग

ब्रेकिंग: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ! २१ ऑक्टोबरला मतदान २४ ला निकाल

भाजप – शिवसेना

अखेर युतीचा फॉर्म्युला ठरला, मात्र शिक्कामोर्तब बाकी!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.