भांबेरी (योगेश नायकवाडे): भांबेरी ते मनब्दा रोड वरील सरस्वती नाल्या जवळील पूल पडल्या मुळे अकोला जाण्यासाठी वाहतूक बंद पडली आहे. तसेच बससेवा आणि इतर वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या अगोदर पण हा पूल पडला होता आणि तेव्हा तात्पुरता सुरु केला गेला होता. पण आता पूर्णपणे कोसळल्या मुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली आहे. या मनब्दा ते भांबेरी रस्त्याचे 2 वर्षांपासून काम सुरु आहे. पण अजूनही पूर्ण झाला नाही प्रवाशांना याचा नाहक त्रास करावा लागत आहे. ठेकेदारही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे या रस्त्याची हि गत झाली असून शासन प्रशासन या कडे दुलक्ष करीत आहे. दापुरा व मनब्दा येथील विद्यार्थ्यांना याच रोडने तेल्हारा शिकण्याकरिता जावे लागते. पण ह्या रस्त्याची अशी अवस्था झाल्या मूळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.
बातम्या पाठवल्या तर चालतील
बातम्यांसाठी संपर्क – ९९२२३९०३०८