बाळापूर (श्याम बहुरूपे): भाजपा युवा मोर्चाचे युवा कार्यकर्ते सचिन पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नुकतीच निवड केली आहे. मुंबई येथे भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष मा.आ. योगेश टिळेकर यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र देऊन सचिन पाटील यांची नियुक्ती केली. सामाजिक व राजकिय कामाची दखल घेत नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेश सुरेश शाह, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, प्रदेश कार्यालय सचिव भरत राऊत,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.