पातूर (सुनिल गाडगे):-पातूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिरवणूक गुरुवारी शांततेत पार पडली यावेळी34 गणेश मंडळांनी स्थापना केली होती तर 16 गणेश मंडळांनी मिरवणूक मध्ये सहभागी झाले होते यामध्ये श्री. सीदाजी महाराज व्यायाम शाळा, जय भवानी व्यायाम शाळा, जय तपे हनुमान, बालाजी गणेश मंडळ,अभिनव गणेशमंडळ, शिवशंकर गणेश मंडळ,संभाजी ग्रुप,लोकमान्य टिळक, शिवशक्ती गणेश मंडळ , जय महाकाली,स्वराज,आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल,ताशाच्या तालावर जल्लोष केला,तर सीदाजी व्यायाम शाळेच्या मुलांनी लाठी-काठी तसेच इतर चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर केले. बाळू पोपळघट, गोलू भाऊ यांच्या घोडयानी नांद करून गुजरी लाईन मध्ये सुंदर नृत्य सादर केले गणेश भक्ता करिता पातूर येथील महात्मा फुले भाजी भांडारच्या कार्यकर्ते यांनी तांदुळ भाताची नाश्ता अशी व्यवस्था केली होती तर गुजरी लाईन मधील गुलाबराव राऊत यांच्या दीपक राऊत,गजानन राऊत आणि जगदंब जलचे अंबादास देवकर यांनी पाण्याची सोय केली होती सकाळी11पासुन सुरू झालेली विसर्जन मिरवणुकीचा रात्री10 वाजता समारोप झाला आगीखेड रोडवरील’र्तेलबुडली’ येथे गणेश विसर्जन ची चांगली व्यवस्था पोलीस, व महसूल विभागाने केली होती तर काही मंडळांनी त्यांच्या सोईनुसार विविध ठिकाणी जाऊन विसर्जन करून गणरायाला निरोप दिला.
श्री. खडकेश्वर आणि गुरुवार पेठ येथील शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ यांनी त्यांचे गणेशाचे विसर्जन हे सायंकाळी सांप्रदायिक भजनी मंडळ, टाळ, मृदंग सोबत केले ,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेश भूषा रितेश भवाने यांनी हुबेहूब साकारली यामुळे भवाने, अणि या मंडळाचा अभंग वर “पावली”कार्यक्रम आकर्षण ठरला. या संपूर्ण मिरवणूक मध्ये गुलाल ऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात आला पातूर च्या या विसर्जन मिरवणुकीत ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता सदर मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार अहेसानोद्दीन , पत्रकार देवानंद गहिले पंकज पोहरे, प्रविण पोहरे अविनाश पोहरे आदि पत्रकार पातूर शहरातील प्रतिष्ठित, शांतता समिती सदस्य, होमगार्ड पथक,पोलीस पथक,महसूल विभाग, विद्युत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.