अकोला (प्रतिनिधी)- कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अकोला यांचे दिनांक 11/09/2019 नुसार कवठा बेरेज प्रकल्पात दिनांक 15/09/2019 ते 16/09 2019 दरम्यान काही कालावधी करीता पुर्ण संचय पातळी (242.50 मी.) पर्यंत जलसाठा करण्याचे नियोजन आहे. ह्यामुळे शेगाव ते देवरी रस्त्यांवरील मौजे लोहार येथील मन नदी पुलावर पाणी राहणार आहे. त्याकरीता शेगाव ते देवरी मार्गावरील वाहतूक काही कालावधीकरीता बंद ठेवावी लागेल. तसेच तदनंतर पुनःश्च़ बॅरेजची पातळी गेट मधुन पाणी सोडुन 240.00 मी पर्यंत आणण्यात येणार आहे.
त्यानुसार दि.15/09/2019 ते 16/09/2019 शेगाव – देवरी मार्गावरील वाहतूक तेल्हारा मार्गे वळविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक अकोला, उपविभागीय अधिकारी बळापुर तहसीलदार बळापुर, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता सा. वा. वि., विभाग नियंत्रक राज्य परीवहन महामंडळ अकोला, उप्रपादेशिक पररीवहन अधिकारी अकोला यांना आवश्यक उपयोजना करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बॅरेजमधुन पाणी सोडतेवेळी बॅरेजचे खालचे बाजूस असलेल्या गावांना पुराच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. या कालावधीत नागरीकांनी पुरस्थितीत नदी काठावर जाऊ नये. नदीत उतरण्याचे कोणीही धाडस करू नये. पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये. असे जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.