अकोला (प्रतिनिधी)- एम.आय.डी.सी.नं.4 शिवणी अकोला येथील खदानित काल दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन करतांना शिवणी येथील रहिवासी चंदन मोरे (वय 27) हा बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले.
आज सकाळी 9:30 वाजता संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात विकी साटोटे, राहुल जवके, मनोज कासोद, मयुर कळसकार, मयुर सळेदार, गोकुळ तायडे यांनी सर्च ऑपरेशन चालु केले. यावेळी शिवणी येथील श्रीराम वाहुरवाघ, गौतम गवई, पप्पु ठाकुर, गणेश मुंडे यांनी आधीच खदानित पाहने चालु केले होते. यापैकी श्रीराम वाहुरवाघ यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना चेतनच्या मृतदेहाला पाय लागल्याचे सांगितले. यावेळी दीपक सदाफळे यांनी श्रीराम वाहुरवाघ आणि गौतम गवई यांना लोकेशन नुसार समोर पाठवले आणि पाण्यात उडी घेऊन अंडर डाऊन अप करुन मृतदेह वर फेकला. श्रीराम वाहुरवाघ यांनी तो मृतदेह कॅच केला. चेतनचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी शोर्य असोसिएशनचे अंकुश डोंगरे, अक्षय श्रीवास आणि एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याचे पि.आय.रामेश्वर चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी आणि महसूल चे तलाठी देशमुख हजर होते. शिवणी येथील प्रविणभाऊ पातोडे, प्रविणभाऊ जगताप हजर होते.