अकोला (प्रतिनिधी)- कोणत्याही वैध परवानाविना देशी पिस्टल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकाला अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं अटक केली.आज सोमवारी दुपारी हि कारवाई करण्यात आलीअसून कुणाल पारस्कर असे या पडकण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.
अकोला शहरातील मोठी उमरी येथे एक युवक संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर,स्थानिक गुन्हे शाखानं येथे धाव घेऊन एका युवकाला ताब्यात घेतले.या दरम्यान, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत कडतुस सापडले. युवकाकडे पिस्टल व जिवंत काडतूस बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. देशी पिस्टलसह एक जिवंत कडतूस असा एकत्रित २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे, दिनकर बुंदे, शक्ती कांबळे, मनोज नागमते यांच्यासह आदींनी केली.