वाडेगाव(डॉ शेख चांद)- वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या १ किलोमीटर अंतरावर वाडेगाव पातूर रस्त्यावर निंबाच्या झाडाला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली आहे.
वाडेगाव वरून पातूर कडे एम एच ३७ एफ ५७३९ या नंबर ची स्पेल्डनर संजय मधुकर इडोळे रा आडोळी ता जी वाशीम येथील युवक जात असताना निबाच्या झाडाला धडक दिल्याने हा युवक जागीच ठार झाला आहे.अपघात होताच वाडेगाव येथील युवकांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला परंतु तो जागीच जीव गेल्याचे समजले.याबाबत वाडेगाव पोलीस सहायक पोलिस निरीक्षक महादेव पडघन, व पो हे कॉ देविदास येऊल, पो कॉ निलेश पायघण, पो ना अशोक नवलकार यांना माहीत पडताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पो अधिकारी डॉ रोहीणी सोळंके व बाळापूर पो स्टे ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव पोलीस करीत आहे.