वाडेगाव(डॉ चांद शेख)– बाळापुर पोलीस स्टेशनच्या वतीने वाडेगाव पोलीस चौकी समोर दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान आगामी गणेश विसर्जन व मोहरम निमित्य उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन शिंदे वाडेगाव पोलीस चौकीचे ए पी आय महादेव पडघम यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा पार पडली
यावेळी सभेमध्ये एकमेकांना सहकार्याची भावना ठेवून सर्व सण-उत्सव शांततेत व आनंदात साजरे करावे असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले तसेच वाडेगाव येथील गणेश विसर्जन १४ सप्टेंबर रोजी असून गणेश मंडळांनी ऑनलाइन अर्ज भरुन द्यावा, गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करून डीजे मुक्त उत्सव साजरा करावा तसेच गणपती मूर्तीची काळजी व देखभाल ही मंडळाचीच असून याची नोंद घ्यावी कुणालीही काही अडचण सूचना असल्यास त्यांनी बाळापुर पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन यावेळी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले
यावेळी बाळापूरला नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके तसेच पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, वाडेगाव पोलीस चौकीचे ए पी आय महादेव पडघम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजवर्धन डोंगरे यांचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच पत्रकारच्या वतीने फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य डॉ. हिम्मतराव घाटोळ,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत मानकर, प्रकाश कंडारकर, दयाराम डोंगरे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सभेला गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य शांतता समितीचे सदस्य ग्रामस्थ पत्रकार बांधव उपस्थित होते