अकोट(देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम पण ज येथील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी माता यात्रेत शुक्रवारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला बोर्डी नदीच्या काठावर महालक्ष्मी मंदिर व दीपमाळ असून दरवर्षी गौरी पुजनानिमित्या भव्य यात्रेचे आयोजन गावकरी करतात यामध्ये पणज व परिसरातील गावकरी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होतात माहेरवाशिणी सुधा या यात्रेत आवर्जून हजेरी लावतात शुक्रवारी भाविक भक्तांनी याठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महालक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता भाविकभकातांच्या सोयीसाठी पनज बस स्टँड ते मंदिरापर्यंत चाहापण्याची व्यवस्था विविध मंडळांनी केली होती गर्दीचे स्वरूप व नदीला पाणी असल्यामुळे ग्रामीण पोलीस व युवकांनी नदीवर चोख व्यवस्था केली चारचाकी व दुचाकी वाहनांची वेगवेगळी वाहनतळ व्यवस्था ग्रामीण पोलीस व गावकरी यांच्या तर्फे करण्यात आली होती भाविकांनी शिस्तबद् रीतीने रांगेत उभे राहून मातेच्या दर्शना चा वमहाप्रसदाचा लाभ घेतला यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांचा सत्कार विजय दातीर प्रदीप ठाकूर संतोष असवार यांच्या हस्ते करण्यात आला उत्सवासाठी परिसरातील सेवाधरी महिला मंडळ,पुरुष मंडळ, व युवकांनी याथाशक्ती मोलाची मदत केली यावेळी एक महिला भक्त चक्कर येऊन पडल्यामुळे त्या महिलेला गावातील दवाखान्यांमध्ये नेण्यासाठी उभे असलेले ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी पोलीस चे गाडी मध्ये बसून मदत केली यात्रा मोहत्सवात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार ज्ञानोबा फड उपनिरीक्षक डाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता