तेल्हारा (प्रतिनिधी)- येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला कार्यरत असलेलेली १०८ रुग्ण वाहीका असली तरी ते सतत नादुरुस्त राहते. शिवाय या रुग्णवाहिका वर डॉक्टर नसल्याने ती रूग्णास मिळत नसल्याचे निवेदन आज लोक जागर मंच तेल्हारा तालुका च्या वतीने तेल्हारा तहसिलदारांना देण्यात आले आहे.
तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाला १०८ रुग्ण वाहीका असली तरी ते सतत नादुरुस्त राहते शिवाय दुरुस्त असली तर डॉक्टर नसते त्यामुळे रुग्णांना ती मिळत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आथीक फटका सहन करत भाड्याने खाजगी वाहन सांगुन रूग्णाना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवावे लागले. याबाबत वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही. याबाबत आज दिनांक ३ सब्टेबर रोजी तेल्हारा तालुका लोक जागर मंचच्या वतीने तेल्हारा तहसिलदारांना निवेदन देण्यात आले असून रुग्णालयाला चांगली १०८ रुग्ण वाहीका व त्यावर डाक्टराची नियुक्ती करावी अशी मागणी लोकजागर मंच चे शहर अध्यक्ष राजेश काटे यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष राजेश काटे, अमोल जवजाळ, निलेश जावकार, दीपक अहेरकर, गणेश ईगळे, गुरुदेव ईसमोरे, सागर गळसकार, पवन भारसाकळे, दिनेश पाथ्रीकर, चंदकांत मोरे, रविन्द्र गावंडे, सोनू वानखडे, अनिकेत सोळंके, मयुर कडु यांच्या सह्या आहेत.