अकोला (प्रतिनिधी)- लोकजागर मंच कडून मा. जिल्हाधिकारी यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा मिळवून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वी मे महिन्यात लोकजागर मंचने मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पिकविमा मिळणेबाबत निवेदन दिले होते. त्याप्रयत्नांना यश आले होते. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम अजूनही जमा झाली नाही, अशा शेतकऱ्यांचा रखडलेला विमा त्यांना वेळेत मिळावा. यासाठी लोकजागर मंच हिवरखेड चे अध्यक्ष महेंद्र कराळे, सहसचिव धिरज बजाज, निखिल भड, अमित डोबाळे यांनी आज पुन्हा निवेदन सादर केले. त्यानंतर लोकजागर मंच च्या शिष्टमंडळाने जिल्हा कृषी अधिकारी यांच्या सोबत ही केळी पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा केली.