अकोट (देवानंद खिरकर): मौजे एदलापूर व पिंप्री जैनपुर शिवार येथील शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटात. या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांवर सुखीचे दिवस येणार अश्या आशा शेतकऱ्याच्या पल्लवित झाल्या होत्या. परंतु अश्या पल्लवित होण्याच्या अगोदरच कपाशी वर मर रोगाचे थैमान माजले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात पडला आहे. अशी परिस्थिती मौजे एदलापूर व पिंप्री जैनपुर शिवार या भागात उद्भवली आहे. त्याकरिता त्या भागातील नैसर्गिक आपत्ती पाहता तात्काळ महसूल विभागाने कपाशी पिकाची नुकसान पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या आशेचे निवेदन शिवसेना व शेतकऱ्यांचं च्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री सिद्धभट्टी व अकोट तहसीलदार श्री अशोक गीते व राजेश घुरव यांना देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडी जिल्हासंघटिका माया ताई म्हैसने, युवासेना विस्ताराक राहुल कराळे, शहर प्रमुख सुनिल रंधे, गटनेता मनीष कराळे, तालुका संघटक योगेश तराळे, कृ. उ.बा. समिती संचालक मोहन गावंडे, माजी शहरप्रमुख अतुल पांडे, दिलीप तराळे, विजय ढेपे, राजेश मानकर, संजय तरळे, रोशन बोडखे, श्रीधर तराळे, जगन्नाथ मानकर, किशोर तराळे, वैभव अनासाने, अलकराव गवारगुरु, सोपन पोहरे, प्रदीप जायले, विलास तराळे, संजय वालसिंगे, सौ. लता ताई तराळे, राहुल तराळे, प्रफुल बोरकुटे, दिनकर तराळे, विनायक तराळे, विशेष तराळे यांच्या सह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.