अडगांव बु. (दिपक रेळे): एदलापुर, ता. अकोट येथिल युवा शेतकरी श्री सागर गजानन कोल्हे हे सकाळी शेतामध्ये गाय, बैल जोडी, म्हैस घेऊन शेतामधे गेले व त्यांनी शेताच्या बांधावर गाय, म्हैस बांधलेली होती. सागर शेतामधे वखराची वाहती करत असतांना त्याला म्हशीचा हंबरण्याचा आवाज आला. त्यावेळी तो म्हशीच्या दिसेने धावत जाऊन त्याला खाली जमीनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक अर्थिंग तार म्हैसी ला स्पर्श झालेला दिसला व म्हैस मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी येऊन पोलीस पाटील राजुभाऊ तराळे यांना महिती दिली.
सबंधीत इलेक्ट्रिक बोर्डाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस स्टेशनचे बिट जमदार श्री. राऊत साहेब, श्री. खंडारे साहेब, तसेच MSEB चे कनिष्ठ अभियंता श्री. भोई साहेब, लाईनमन भुसुम साहेब, जाधव साहेब, पटवारी वाघमारे मॅडम, PM साठि अलेलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण साहेब यांनी सर्वांनी घटनास्थळी पाहनी केली व पंचनामा केला. म्हशी अंदाजे 5 वर्षे वयाची असुन म्हशी नउ महिन्याची गाभन निघाली. यावेळी एदलापुर येथील गावकरी उपस्थित होते.