पातूर (सुनील गाडगे): पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम चिखलगांव येथील युवक चिखलगांव शिवारातील पाझर तलावमध्ये बुडून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार दि. ३० आॅगस्ट २०१९ चे दुपारी ०२:०० वाजता घडली.
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम चिखलगांव येथील युवक ओम गोपाल थोरात वय १७ वर्ष हा गावातील युवकांसोबत चिखलगांव शिवारातील पाझर तलाव येथे बैल धुण्याकरिता गेला असता त्याचा पाझर तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ०२:०० वाजताचे सुमारास घडली. ग्रामस्थांनी पातूर चे ठाणेदार गजानन गुल्हाने यांना माहिती दिली. माहिती मिळताच ते पोलीस कर्यचाऱ्यांसह “सास”ची रुग्णवाहिका घेवुन घटनास्थळी पोहोचले. व गोपाल च्या मृतदेहाला ताब्यात घेतले. गोपाल च्या मृतदेहाला “सास” च्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आले. या प्रकरणी पातूर पोलीसात मर्ग नं. ३६/१९ कलम १७४ जाफौ नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करित आहेत.