अडगाव बु. (दिपक रेळे)- पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्याकरिता शासन वेगवेगळे प्रयोग करीत आहे. अशातच अडगाव बु. येथील शेतकरी लक्ष्मीकांत कौठकर यांनी शासनाच्या बंदी ला झुगारून HT BT प्रतिबंधित कपाशीच्या वाणाची चोवीस जून ला लागवड केली होती. या वर्षी विदर्भामध्ये पाऊस जोऱ्याचा होत आहे. पिकात तणांचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये मजुरी तीनशे ते चारशे प्रति मजूर पाच तास करिता मजुरी घेत असल्याने शेतकरी शेतातील तणा समोर हतबल झालेले दिसतात. काही भागात मजुरी चा खर्च बघता शेती पडीत पडण्याच्या मार्गावर आहे.
चोवीस जून ला शासनाने प्रतिबंधित केलेले HT BT चे वाण जाहीररीत्या अडगाव बु. येथे लावणी केली होती. आज या वानाला दोन महिने पूर्ण झालेले आहेत .या वाणामध्ये ग्यायफोसेट तणनाशक सहनशील असल्याने 280 रुपये प्रति एकर चा फवारणी चा खर्च येत आहे. इतर दुसऱ्या कपाशी च्या वानाला निदनी चा आणि मशागती चा खर्च 15000 ते 20000 रुपये प्रति एक्कर येत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या प्लॉट ला भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत. या कपाशीच्या शेताला जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या अध्यक्षांनी भेट दिली. यावेळी बाजरंग बली फार्मर प्रोड्युसर कंपनी वारखेड चे अध्यक्ष सत्यनारायण म्हसाये संकल्प फार्मर प्रोड्युसर कंपनी वरुड बिहाडे चे अध्यक्ष वरुड अनिल बिहाडे, संचालक शिवचारण बिहाडे, हिरकणी फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष सचिन अंबाळकर, अंशुमन जाधव, शिवार्पण फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष शिवाजी बहाकर, प्रशांत बहाकर आणि शेतकरी जाफर खा व इतर शेतकरी उपस्थित होते.