हिवरखेड (दिपक रेळे): अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्न कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करण्यासाठी हिवरखेड शहरातून मदतफेरी काढली. बाजाराचा दिवस असल्याने हिवरखेड व परिसरातील नागरिकांनी मनापासून मदतीचा हात दिला. मदत संकलन रॅलीला कला वाणिज्य महाविद्यालय येथून सुरुवात जागर फाऊंडेशनचे तुळशीदास खिरोडकार, निखिल गिऱ्हे, प्राचार्य अरुण हागे, प्राध्यापक अरुण तायडे, प्रा .विजय खूमकर सर, प्रा.जया दुधे, प्रा. प्रिया अंदुरकार, प्रा.विनोद वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. समारोप पोलीस स्टेशन हिवरखेड येथे करण्यात आला. जमा रक्कम धनाकर्ष द्वारे जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण हागे यांनी प्रतिनिधींना सांगितले