बाळापूर (शाम बहुरूपे)- आज सकाळी 4.30 वा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शेगाव टी पॉईंट जवळ दोन कंटेनर मध्ये अमोरा समोर धडक होऊन भीषण अपघात होऊन ह्यात दोन्ही वाहनाचे चालक जागेवरच ठार झाले. तर 1 जण जखमी झाला.
आज सकाळी 4.30 वा दरम्यान कुरियर घेऊन खामगावकडे जाणारा कंटेनर क्र HR 55 1334 व लोखंडी कॉइल्स घेऊन अकोला कडे जाणारा कंटेनर क्र MH 48 BM 2543 ह्यांचे मध्ये अमोरा समोर भीषण अपघात झाला, अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर झाला व चालक जागेवरच मरण पावले. बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना माहिती मिळताच ते पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत शिंदे, अनिल खिल्लारे, गिरीश वीर, देवानंद कायंदे, महामार्ग पोलीस चौकी चे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक गजानन गावंडे, दिनकर सोळंके, पोलीस कर्मचारी दिनेश झटाळे, योगेश मेहरे, अमर दीप गुरू, अजय दामोदर, प्रशांत डोईफोडे ह्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन केबिन कापून मृत ड्राइवर चे शव बाहेर काढले, दुसऱ्या कंटेनर मध्ये असलेले 35 टन चे लोखंडाची कवाईल्स ट्रक चे मागील केबिन फोडून ड्राइवर वर कोसळल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली, दोन्ही ट्रक रोड वर असल्याने रोड त्वरित मोकळा करणे सुद्धा आवश्यक असल्याने 3 क्रेन बोलावून दोन्ही ट्रक वेगळे करून जागेवरच मरण पावलेल्या दोन्ही चालकांना कंटेनर च्या केबिन मधून बाहेर काढून 4 तासात रोड मोकळा करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके ह्यांनी भेट दिली.