अडगांव बु(दिपक रेळे)– महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण प्रदेशात मराठी भाषेच्या जोडीला अनेक बोली आपल्या श्रीमंतीने नांदतात. त्यातील एक आणि संपूर्ण विदर्भात बोलली जाणारी भाषा म्हणजे वऱ्हाडी बोली होय. या वऱ्हाडीची श्रीमंती देशभर पोहचवण्यासाठी अखिल विदर्भ वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठान अमरावती द्वारा संचालित धमाल कवी संमेलनाचे आयोजन नुकतेच अडगाव येथे करण्यात आले
शेती आणि शेतकऱ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्राच्या कवीचे कृषी संस्कृतीवरचे प्रेम बावणकशी होते. या कवीने विदर्भाच्या गावागावाला वऱ्हाडी भाषेतील कवितांवर डोलायला शिकवले. अखिल विदर्भ वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठान अमरावती द्वारा संचालित धमाल कवी संमेलनाचे आयोजन नुकतेच अडगाव येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिध्द प्रभोदणकार सत्यपाल महाराज असून
या साहित्य संमेलनावर अमरावती मोठी छाप असून मोठी छाप असून अमरावतीचे लोककवी,जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. सतीश तराळ,वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष चोहान,प्रामुख्याने उपस्थित होते
कवींनी वर्हाडी बोली भाषेत आपल्या कविता सादर केल्या. सतीश तराळ व चोहान यांनी सादर केलेले वऱ्हाडी भाषेतील कविता सादर केल्या उपस्थित रसिकांनी या कार्यक्रमाला विशेष सहभाग नोंदविला