तेल्हारा (प्रतिनिधी)- अकोट येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार भारसकळे यांच्या विरुद्ध बंड पुकारून स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती त्या पाठोपाठ आज तेल्हाऱ्यात सुद्धा भाजपा पदाधिकारी यांनी आमदारांविरुद्ध बंड पुकारून स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी एका बैठकीत पदाधिकारी यांनी एकमताने संमत करून वरिष्ठांकडे तशी मागणी एका निवेदनाद्वारे करणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अकोट विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवारास उमेदवारी द्यावी अशी मागणी 18 ऑगस्ट रोजी भागवत मंगल कार्यालयात झालेल्या पक्षाच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ता बूथ प्रमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.
अकोट मतदारसंघ हा तेल्हारा अकोट तालुका असा संयुक्त मतदारसंघ असून या मतदारसंघात जनसंघ जनता पार्टी पासून ते आज भारतीय जनता पक्षाचे सक्रिय काम करणारे निष्ठावंत असे शेकडो कार्यकर्ते पक्षांमध्ये आहेत या कार्यकर्त्यांनी मतदार संघात झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे अकोट विधानसभा मतदार संघाने तसेच या मतदारसंघातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पार्टीला विजयश्री मिळवून देण्याकरिता मतदारसंघातून मोठी आघाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवून दिली आहे याचे उदाहरण म्हणजे भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर जेव्हा जेव्हा लोकसभा निवडणूक लढले तेव्हा तेव्हा त्यांना अकोट मतदारसंघाने विशेष करून तेल्हारा तालुक्याने कार्यकर्त्यांच्या सहाय्याने मोठी आघाडी मिळवून दिले आहेत त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व 3 टर्म चे खासदार संजय धोत्रे यांनासुद्धा या तालुक्याने मोठी मतदान आघाडी कार्यकर्त्यांमुळे मिळाल्याचे स्पष्ट आहे अशातच 2014 मध्ये वेळेवर तुटलेल्या युतीमुळे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अमरावती जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस, अपक्ष,असा प्रवास करून उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी दिली तरीसुद्धा तेल्हारा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने कुठलीही नाराजी न दाखवता एक दिलाने काम करून प्रकाश भारसाकळे यांना प्रचंड मतांची आघाडी मिळवून विजय केले परंतु निवडून आलेल्या आमदारांकडून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविषयी वागणूक योग्य नसून गेल्या पाच वर्षात त्यांची नाळ कार्यकर्त्यांची जुळले नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट तेल्हारा मतदारसंघातील स्थानिक उमेदवारास उमेदवारी द्यावी अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी बूथ प्रमुख कार्यकर्ता यांनी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री संजूभाऊ धोत्रे यांच्याकडे केली आहे निवेदनावर तालुक्यातील शेकडे एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.