तेल्हारा (आनंद बोदडे)– महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन बस सेवा सुरू आहे. मात्र बसमधील तिकीट चेक करण्यासाठी परिवहन विभागाचे तिकीट चेकर हे मनमानी करून बस जिथे वाटेल तिथे बस थांबवून प्रवाशांना नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, काल राञी दि.१५ आगष्ट रोजी अकोला तेल्हारा येणारी बस क्रं MH 40 -Y -5693 हि बस चेकिंग करण्यासाठी दोन वेळा थांबवुन चेक केली. त्यामुळे प्रवाशांना नाहक ञास सहन करावा लागला. तिकीट चेकिंग धावत्या बसमध्ये करण्याचा नियम असतांना, बस उभी करुन चेक करुन प्रवाश्यांना वेठीस धरण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न निर्माण होत असुन याला आळा घालण्यासाठी बस उभी करुन चेक करणाऱ्या चेकरवर कारवाई केल्यास असे प्रकार होणार नाहीत व प्रवाशांची गैरसोय सुध्दा होणार नाही.
रस्त्याची अतिशय चाळणी झालेली असल्यामुळे बसेस वेळेवर येत नाही, आणी खराब रस्त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिनाम होत आहे. आणी तासनतास बसेसची वाट पाहुन प्रवाशी ञस्त होत, असतांना या बसेसची तिकीट चेकिंग अकोला ते तेल्हारा दरम्यान दोन ते तिन वेळा करण्यात आल्यामुळे यामध्ये प्रवास करणारे प्रवाशी श्री. शुध्दोधन दारोकार (मागासवर्गीय विद्युत कर्मचारी परिमंडळ सचिव) यांणी बस थांबवुन चेकिंग का करता धावत्या बसमध्ये चेकिंग करा म्हटले ,तरीही पळसपगार नामक चेकिंग करणाऱ्या चेकरने बस थांबवुन चेकिंग केली त्यामुळे प्रवाशांना नाहक ञास सहन करावा लागला. या बसला तेल्हारा पोहचण्याकरीता तब्बल ३ तासाचा कालावधी लागला या बाबीची चौकशी करुन त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.