तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील नदीच्या पुरामुळे नदी काठच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्यांचे पिक खरडून गेले आहेत.त्यामूळे आता शेतकर्यानवर मोठे संकट कोसळले आहे.तरी दोन दिवसां पासुन पावसाने विश्रांती घेतली आहे.तरी देखील पूर्णा,विद्रूपा,आस या नदी काठच्या शेतीचा सर्वे करण्यास तेल्हारा तहसीलदार यांनी सुरवात केलेली नाही.झालेल्या नुकसानिची भरपाई मिळन्याच्या दृष्टीने त्वरित सर्वे करायला प्रारंभ करावा, तातडीने शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच तेल्हारा तालुक्यात काही लोकांची घरे पडझड झाली आहे त्याचा देखील त्वरित पंचनामा करावा. अश्या आशयाचे निवेदन लोकजागरमंच तेल्हारा च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदन देते वेळी लोकजागर मंच चे तेल्हारा तालुकाध्यक्ष अमोल जवंजाळ,शहर अध्यक्ष राजेश काटें, चंद्रकांत मोरे, सागर गळसकर, अनंत अहेरकर ,रामभाऊ फाटकर,शिवा दिंड़ोकार आदी सदस्य व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.