अकोट(देवानंद खिरकर): राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तथा अ.भा.आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रेल्वे स्टेशन चौक ते पं स. कार्यालय येथे मोटार साईकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तरी समारोपीय कार्यक्रम बचत भवन पं.स. सभागृह अकोट येथे करण्यात आला.
आजचा दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. हा दिवस संपूर्ण आदिवासी समाजासाठी एक सोन्याचा दिवस म्हणून या दिवसाची प्रचिती येते..ह्याच दिवशी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे गाैरव करण्यात येताे.म्हणून याला” जागतिक आदिवासी गाैरव दिन” असे सुद्धा म्हटले जाते.इतिहास काळी इंग्रजांनी आदिवासी समाजावर केलेला अन्याय,अत्याचार अशा अनेक पिडा समाजाने सहन केले व त्याचा वचपा काढण्यासाठी समाजात काही क्रांतिकारी ही घडले .त्यातील एक क्रांतिकारी शहीद बिरसा मुंडा…हे मुळचे झारखंड येथील..त्याकाळी ते समाजासाठी लढले व इंग्रजांना पळवुन लावले..व देशासाठी लढताना शहिद झाले.
यावेळी आदिवासी बांधवांना उमेश पवार यांनी मार्गदर्शन केले.आदिवासी हे या देशाचे मुळ रहिवासी असुन आदिवासींनी संस्कृती टिकवुन ठेवण्यासोबतच आपली भावी पिढि शिक्षीत करून संघटीत करने काळाची गरज आहे. तसेच शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी संघटना सदैव प्रयन्नशील आहे.
या वेळी कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पवार ,अध्यक्ष म्हणुन सुरेश तागडे महासचिव भारतीय विद्यार्थी मोर्चा तर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती पांडुरंग तायडे, सुभाष सुरत्ने सामाजिक कार्यकर्ता दादाराव भाष्कर, भाष्करराव वानखडे, भाष्करराव होले, आयोजक राजेश साकोम ,महेन्द्र पवार गजानन दोड, आदि. मान्यवर उपस्तीत होते. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन राजेश साकोम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामकृष्ण ढिगर,विष्णू राऊत, राम टेकाम ,मनिष बामणकर, विनोद काकोडकर, विजय भारसाकडे , देवा मोरे,रूपेष टेकाम ,सतिष वोरते, टायगर शेलुकर, अनिल मावस्कर, विष्णू राहुत, सतिष रेते,आदि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयन्न केले यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव उपस्तीत होते..