पातूर (सुनील गाडगे)-येथील नामांकित मदर इंडिया कॉन्व्हेंट मध्ये28जुलै रोजी राष्ट्रीय पालक दिन बेरार एज्युकेशन सोसायटीच्या सचिव तथा जेष्ठ मार्गदर्शक सौ.स्नेहप्रभादेवी गहिलोत यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला
यावेळी कॉन्व्हेंटच्या लहान मुलांनी विविध भूमिका सादर करून आई वडील यांच्या करिता आदर ठेवा त्यांना वृद्ध आश्रमात पाठवू नका असा आशय असलेली नाटिका सादर करण्यात आली.तर काही विद्यार्थ्यांनी आई,वडील यांचे विषयावर गीतांचे गायन केले.तर मंगला उंबरकार यांनी संचालन केले.यावेळी मदर इंडिया कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका प्रविना सुरसे,शीला काळे, प्रतिभा वानखडे,दिपमाला गहिले, स्वाती राऊत,सृष्टी धांडे, मीना निंबोळे, मंगला कवर, ललिता घोलप, छाया निमकंडे ,मोना निमकंडे , तृप्ती इंगळे, रश्मी इंगळे,कुणाल विंचूरकर, किशोर पोपळघट,किरण अंतरकर,श्री. डवले ,ताहेर शेख, श्री.राठोड,उषा धरमकर,पूजा भिंगे,सोनाली शेलुडकर ,चंद्रकांता हिरळकर,आदी शिक्षक वृंद आणि विध्यार्थी उपस्थित होते.