हिवरखेड (दीपक रेळे) : चितलवाडी येथे नळाचे पाणी भरण्यावरु वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणात हिवरखेड पोलिसांनी पाच जणांविध्द बुधवारी गुन्हा दाखल केला.
आकाश सोळंके(21) याच्या तक्रारीनुसार त्याची आई व संजय डाबेराव याच्या पत्नीमध्ये मंगळवारी वाद झाला. नंतर तो वाद मिटलाही होता परंतु रात्रीदरम्यान पुन्हा वादाला तोंड फुटले. डाबेराव याने माझ्या पत्नीसोबत भांडण का केले, असा जाब विचारला आणि त्याने आकाश सोळंके याच्या डोक्यावर वार केला आणि आरोपी पळुन गेला आकाशच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संजय डाबेराव, नंदूलक्ष्मण डाबेराव, शिवलिंग नंदू डाबेराव, यांच्याविरुध्द भादंवि कलम 307, 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. नंदू डाबेराव याच्या तक्ररीनुसार नळावर पाणी. भरण्यावरुन सोळंके. कुटंबीयांनी वाद घातला तसेच मारहाण केली.
त्यामुळे पोलिसांनी ज्ञानेश्वर सोळंके, आकाश सोळंके. याच्याविरुध्द भादंवि कलम 324, 504, 506 नसार गुन्हा. दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार आशिष लव्हंगळे पिएसआय महेद गवई, एएसआय गोपाल दातीर, आकश राठोड एएसआय असलम पठाण व नीलेश बोरकुटे करीत आहेत.
अधिक वाचा : शेतकऱ्यांसाठी हायटेक यंत्रणा, लाडेगाव येथे ड्रोन द्वारे फवारणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola