वाडेगांव (डॉ शेख चांद) : दि २४ कार्यक्रमाचे सुरुवात दीप प्रज्वलित करून श्री. धुळधुळे सरांनी केल त्यानंतर उपस्थीत मान्यवरांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार घालून प्रतिमेचे पुजन केले.
दिनांक 22 -07- 2019 ला ग्राम पंचायत चिंचोली गणु येथे भव्य रोगनिदान, रक्त तपासणी व उपचार शिबीर संपन्न झाले.
या ठिकाणी ग्रामस्थांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली व तसेच समस्त गावकऱ्यांनी या कार्यक्रमास आपले योगदान दिले. प्रमुख उपस्थिती डॉ सुमेध धुळधुळे MBBS MD मेडिसीन, डॉ आर बी मंत्री यांनी शिबीराला आपली उपस्थिती दर्शवली व आपली सेवा दिली.
तसेच याप्रसंगी आपल्या बाळापूर पंचायत समितीचे लेखाधिकारी श्री. नरेंद्र राऊत सर, बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती अय्याज साहिल सामाजीक कर्यकर्ते व चित्रपट दिग्दर्शक डॉ एस चांद इत्यादी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती. त्याचबरोबर श्री. सुर्वे सर तसेच श्री. दामोदर सर व श्री. सुरडकर सर अकोला यांनी आपली उपस्थिती दर्शवली या शिबिराला गावकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच शिबिरासाठी वेळात वेळ काढून आलेले डॉ. श्री. सुमेध धुळधुळे सर MBBS MD MEDICINE यांनी आपली उपस्थिती दर्शविली तसेच आमचे मार्गदर्शक श्री. राऊत सर यांच्या मुळे या कार्यक्रमाचे आयोजन करता आले त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे व राऊत सरांचे व उपस्थीत सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत असे गावकऱ्यांच्या वतीने अमोल सरदार सर यांनी सांगीतले, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे पण मनापासून आभारी व स्वागत येणार्या काळात आपण अजून भरभराटीस यावे हीच आमची चिंचोली गणूतील सर्व गावकर्यांतर्फे सदिच्छा. कार्यक्रमाचे आयोजन अमोल सरदार सर व समस्त गावकरी तसेच ग्राम पंचायत चिंचोली गणु यांनी केले होते.
अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola