*अवर अकोला न्युज च्या पाठपुरव्याला यश
तेल्हारा (प्रतिनिधी)- सद्या पावसाळा सुरू असुन गाडेगाव ग्रामपंचायत कडुन दुषित पाणी जनतेच्या पिण्यात येऊ नये म्हणून विषेश खबरदारी घेण्यात येत आहे.
याकरीता गावातील लिक असलेले पाईप दुरुस्त करण्यात येत आहेत. पाईपलाईनवरील वालांचे खोदकाम करुन दुरुस्ती करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी गाडेगाव ग्रामपंचायत मध्ये दुषित पाण्यासंदर्भात शौचालयाचे पाणी नळाला येत असल्याची लेखी तक्रार केली होती. त्या संदर्भात अवर अकोला न्युज ने पाठपुरावा करून ग्राम पंचायत प्रशासनाला जागे केले होते त्यामुळे ग्राम पंचायत ने सबंधित तक्रारीवरुन जिथं जिथं पाईप व वाल लिक आहेत त्या त्या ठिकाणी स्वतः सरपंच हजर राहुन दुरूस्तीचे कामे करुन घेत आहे.
दुषित पाण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे गावातील पाईप लिकेजचे काम मी स्वतः उपस्थित राहुन युध्दपातळीवर करून घेत आहो. ग्रामपंचायतच्या वतीने समस्त गावकऱ्यांना विनंती आहे की आपल्या ज्या काही समस्या असतील त्या ग्रामपंचायतच्या लक्षात आणुन द्या ग्रामपंचायत आपल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.
प्रमोद वाकोडे
सरपंच ग्रा.पं गाडेगाव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola