अकोला : गेल्या पंधरा दिवसांपासून गायब झालेला पाऊस आज दुपारी जोरदार बरसला. पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन आणि आंतरपीक घेतलेल्या शेतकऱ्यांना पिकांची चिंता लागली होती.
पाऊस पडत नसल्यामुळे काही ठिकाणी पिके करपली होती. काही ठिकाणी जमिनीत ओलावा असल्यामुळे पिके कशीबसी तग धरून होती. अनेक ठिकाणची मात्र परिस्थिती विपरीत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाकडून हा पाऊस कमी काळ चालेल म्हणून शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे पीक घेण्यावर भर द्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे. 20 तारखेपासून जिल्ह्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola