अकोला : अकोल्यातील काही युवक तिरुपती बालाजीला दर्शनाला जात असताना नवजीवन एक्सप्रेस मधून खाली पडून दोघांचा अपघाती मृत्यू झाला.
ही घटना वर्धा ते हिंगणघाट दरम्यान आष्टा (भुगाव) जवळ July 17 च्या रात्री 11.30 वाजता घडली ज्यामध्ये अकोल्यातील सागर बगाडे (28) व सारंग नाटेकर (21)या दोघांचा मृत्यू झाला.
हे दोघे रेल्वे डब्याच्या गेटवर बसून प्रवास करीत होते ते दोघे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर मित्रांनी हिंगणघाट रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस ट्रॅक शोधत आले असता आष्टा गावाजवळ ट्रकवर दोन जण पडून असल्याचे दिसले या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला असून मृतदेहांचे शवविच्छेदन सेवाग्राम शासकीय रुग्णालयात सुरू असून शवविच्छेदनांनंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाना सोपविण्यात येतील.
याबाबत सेवाग्राम पोलीस स्टेशनला रेल्वे डब्यातून मृत्यू झाल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक S G Bothe यांनी दिली.
अधिक वाचा : अकोला : ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत पावसासाठी वरुणराजाकडे साकडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola