बाळापूर (शाम बहुरूपे) : बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये चोरी करणारे रामकिशोर सुरजप्रसाद राजपूत वय 32 वर्ष व सुरज भीमराव सिरसाट वय 22 वर्ष दोन्ही राहणार ग्राम कोळसा ह्यांच्यावर सण 2018 मध्ये चोरीचे 3 गुन्हे दाखल होते, पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख ह्यांचे मार्गदर्शनाखाली दोन्ही आरोपींचा तडीपार प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम राकेश कला सागर ह्यांचे कडे पाठविला होता, आगामी सण उत्सव लक्षात घेता पोलीस अधीक्षक ह्यांनी नमूद दोन्ही गुन्हेगार ह्यांना अकोला जिल्ह्यातून 2 वर्ष तडीपार आदेश जारी केला, आदेश प्राप्त होताच पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्वरित सदर आदेशाची अंमलबजावणी करीत दोन्ही आरोपींना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भलतीलक व गिरी ह्या कर्मचाऱ्यांचे पथक पाठवून दोन्ही आरोपींची जिल्ह्या बाहेर रवानगी केली व 2 वर्षा साठी जिल्ह्यात प्रवेश न करण्याची त्यांना तंबी देण्यात आली.
अधिक वाचा : बोर्ड़ीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त शाळेवर मुख्याध्यापकच नसल्याने मुख्याध्यापक द्या गावकऱ्यांची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola