तेल्हारा : शासना मार्फत जेष्ठ नागरिकांसाठी नव्याने स्मार्ट कार्ड देण्याची योजना सुरू झाली असता तेल्हारा आगर येथे नागरिकांना यासाठी होणारा नाहक त्रास पाहता युवसेनेने आज 1 जुलै ला तेल्हारा येथील आगर प्रमुखांना जेष्ठ नागरिकांना सोबत घेऊन घेराव घालून त्यांना होणार्या त्रास बाबत निवेदन देण्यात आले.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकरराव रावते यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक स्मार्टकार्ड या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर जेष्ठ नागरिकांकरीता स्मार्ट कार्ड काढण्याचे काम सुरू आहे. तेल्हारा येथील बस स्थानकावर तेल्हारा तालुका व शहरातून मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नगिरकांची रिघ लागत आहे, पण तेल्हारा येथील बस स्थानकावर जेष्ठ नागरिक सवलत करिता एकच संगणक असल्या मुळे जेष्ठ नागरिकांना दिवस भर तातकळत बसावे लागत असून त्याची गैर सोय होत असल्याची बाब काही जेष्ठ नागरिकानीं युवा सेना पदाधिकारी यांच्या कडे मांडली असता त्याची ही समस्या मांडताच युवसेनेच्या पदाधिकारी यांनी तेल्हारा येथील बस स्थानक आगर प्रमुख यांना भेटून लवकरात लवकर जेष्ठ नागरिकांची गैर सोय होणार नाही याची दखल घ्यावी या करिता युवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तेल्हारा येथील बस स्थानकावर जेष्ठ नागरिकाची वाढती गर्दी पाहता बस स्थाकावर अधिक वाढीव संगणकाची व्यवस्था व यांची नेमणूक करण्यात यावी व त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांकरीता योग्य ती बसण्याची सुविधा करावी जेणे करून जेष्ठ नागरिकाना त्रास होणार नाही. असे या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी रामभाऊ फाटकार, युवसेना तालुका प्रमुख मुन्ना पाथ्रीकर, युवसेना जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे, युवसेना श्हर संघटक स्वप्नील सुरे, किशोर डांबरे, प्रज्वल मोहोड, वैभव गावंडे, अंकुश बुरघाटे, सूरज देशमुख, सौरव कापसे, आकाश पवार, श्रीकांत टेकाडे, महेश गाढे, स्वनिल इंगळे, नयन मोहोड, अभय गाडेकर, श्रीकांत मोहनकार, रतन मोहंकार, मंगेश आखरे, त्याच बरोबर द्वारका बाई उमाळे, मुरलीधर पाटील, निर्मलाबाई मुरकुटे, द्वारकबई हागे, सुशीलाबाई नागपुरे, सुशीलाबाई मानतकार, तुळसाबई कोरडे, विठ्ठल लाहोरकर, प्रभा बाई इंगळे यांच्या सह असंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
- जेष्ठ नागरिकांकरीता शासनाची स्मार्ट कार्ड योजना चांगली असली तरी सदर कार्ड देण्याबबात कुठल्याही सुसूत्रता नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक, शाररिक, त्रास सहन करावा लागत आहे तरी या कडे विषयाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे – जनार्दन चातरे तालुका उपाध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ
- जेष्ठ नागरिकां स्मार्ट कार्ड करिता त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल – वानरे आगर प्रमुख तेल्हारा
अधिक वाचा : लोकजागर मंचने स्वीकारले मुस्लिम मुलीचे शैक्षणिक दायित्व
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola