अकोला : नवी दिल्ली – विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. १ जुलैपासून विनाअनुदानित एलपीजीचा दर १००.५० रुपयांनी घटणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर-रुपये एक्सचेंज दरात झालेल्या बदलाच्या परिणामामुळे एलपीजीचा दर घटला आहे.
बदललेल्या दरानुसार, ७३७.५० रुपयांचा सिलिंडर ६३७ रुपयांना मिळणार आहे. अनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना देखील १०० रुपये कमी मोजावे लागणार आहेत. अनुदानित सिलिंडरच्या ग्राहकांना प्रति सिलिंडर १४२.६५ रुपये अनुदान मिळाल्यानंतर एका सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत ४९४.३५ रुपये होणार आहे. अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना सिलिंडर घेताना बाजारभावानुसार घ्यावा लागतो आणि नंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते. अनुदानित सिलिंडर घेणाऱ्यांना एका वर्षात १२ सिलिंडरवर अनुदान मिळतं.
महिन्याभरापूर्वी घरगुती गॅसच्या दरात ४ टक्के वाढ झाली होती आणि प्रति सिलिंडर २५ रुपये दर वाढला होता. दर घटल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
अधिक वाचा : बाळापूर पोलिसांनी 24 तासात लावला चोरीचा शोध, चोर आणि 1 लाखाचा मुद्देमाल ताब्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola