मुंबई – राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या पिशव्यांपासून तयार होणाऱ्या ३१ टन कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने नामी उपाय शोधला आहे. यापुढे दुधाची पिशवी विकत घेताच ग्राहकाला ५० पैसे जमा करावे लागतील. दुसऱ्या दिवशी रिकामी पिशवी परत केल्यावर पैसे परत मिळतील. संकलित केलेल्या पिशव्यांवर पुनर्प्रक्रिया करून प्रदूषणावर आळा घालण्यास मदत होईल, असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या वर्षी गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदीचा निर्णय झाला होता. पण दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण न झाल्याने त्यावर बंदी घालण्यात आली नव्हती. यामुळे राज्यात दररोज सुमारे एक कोटी दुधाच्या पिशव्यांपासून ३१ टन कचरा निर्माण होत आहे. हा कचरा टाळण्यासाठी दुधाच्या पिशव्या परत घेण्याचे शासनाने ठरवले आहे. ग्राहकाने दुधाची पिशवी विकत घेताना त्यास विक्रेत्याकडे ५० पैसे जमा करावे लागतील. दुसऱ्या दिवशी रिकामी पिशवी विक्रेत्याला परत केल्यावर ग्राहकाला त्याचे ५० पैसे परत मिळतील. यामध्ये ग्राहकाला कोणताही जादा दर देण्याची गरज पडणार नाही, असे कदम म्हणाले. दरम्यान, या जमा केलेल्या पिशव्यांवर पुनर्प्रक्रिया केली जाईल, असे रामदास कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. महिनाभरात ही योजना अमलात आणणार असल्याचे ते म्हणाले. आमदार सुनील प्रभू यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. हा निर्णय घेण्यापूर्वी कदम यांनी गेल्या आठवड्यात दूध उत्पादक संघासोबत बैठक घेतली होती. त्यातून हा पर्याय समोर आला.
अधिक वाचा : सलग दुसऱ्या दिवशी महागले पेट्रोल-डीझेल, जाणून घ्या आजचे दर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola