हिवरखेड (दिपक रेळे) : शनिवार पासून मंगळवार दुपार पर्यंत एकूण 96 तास दानापूर फिडर वरील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल आणि चिंताग्रस्त झाला असून महावितरण शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
एव्हडे होऊ नही 25 जून रोजी दुपारी संध्याकाळी पाहावयास मिळाले कालावधी साडेतीन वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला पण संध्याकाळी 5 वाजता नियोजित वेळ संपल्यामुळे फक्त अंदाजे 1-30 तास लाईन दीली. इतक्या लांब कालावधी साठी विद्युत पुरवठा खंडित असल्याने किमान विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर तरी आठ तास वेळ सुरू ठेवणे अपेक्षित होते परंतु फक्त दीड तासात लाईन बंद केल्यामुळे महावितरणला शेतकऱ्यांचे समस्यांशी काही सोयरसुतक नसल्याचे उपरोक्त घटनेवरून दिसत आहे.
मागिल 96 तासात शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या शेतातील नुकसान भरपाई कोण देणार? असा सवाल हि शेतकरी उपस्थित करीत आहेत.
वानप्रकल्पाचे अधिकारी वर्गाने सुद्धा कापुस पेरणीसाठी कालवा सुरु केला, शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन कालवा सुरु राहील या विश्वासावर कापुस लागवड केली, नंतर एकदिवसीय 1 तास आलेल्या पावसाचे पाणी शेतकऱ्यांना भरपुर समजुन कालवा बंद करुन टाकला त्यामुळे पाणी पडले होते तर विद्युत पुरवठा खंडित होता आता विद्युत पुरवठा सुरळीत झाला तर पाण्याचा कालवा बंद केला आहे त्यामुळे शासनाच्या विविध विभागांमार्फत शेतकऱ्यांची शेकडो एकर कापुस लागवड संकटात आणुण शेतकऱ्यांना एक प्रकारे करोड़ों रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार म्हणावा कि काय? मग अशा प्रकारे शासकीय कामे चालत असतील तर ती महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या नियम, प्रोव्हीजन, कायदे, अंतर्गत चालतात याबद्दल जनतेला माहीती मिळणे आवश्यक आहे कारण याचा संबंध ” विमा कंपनी ” चे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो काय? असा प्रश्न भारत कृषक समाज ते शेतकरी राजकुमार भट्टड यांनी मांडला आहे.
याप्रकरणी दानापूर अभियंता गुहे साहेबांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी हिवरखेड 132 केंद्रात बिघाड असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याचे सांगितले होते आणि नंतर यांनी शेतकऱ्यांचे फोन सुद्धा उचलणे बंद केले.
तसेच याबाबत दैनिक सकाळने महावितरणचे अभियंता सचिन कोहळ यांच्याशी संपर्क साधला असता शनिवारी आलेल्या वारा वादळामुळे विद्युत पोल उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा 3 दिवसापासून खंडित असल्याचे सांगितले आणि नैसर्गिक आपत्ती मध्ये आम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही याबाबत गुहे साहेबांना विचारा असं स्वतःची जवाबदारी झटकनारे वक्तव्य करण्यासही ते विसरले नाहीत.
एकाच प्रकरणात महावितरणच्या दोन अभियंत्यांनी वेगवेगळे कारण सांगितल्यामुळे तब्बल 96 तास विद्युत पुरवठा खंडित राहण्याचे नेमके रहस्य काय आहे हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.
अधिक वाचा : HTBT कापूस आणि BT वांग्यासाठी शेतकरी आग्रही, मग सरकारची परवानगी का नाही?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola