अकोट (देवानंद खिरकर)- दि २४/०५/२०१९ रोजी अकोला लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी अकोट तालुक्यातील ग्राम मोहाळा येथील भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी व बूथ क्र १९० चे बूथ प्रमुख मतीन खाँ शेर खाँ पटेल होते. मतदान केंद्रावरील गैरप्रकार त्यांचे दक्षतेने बंद पडले व त्यामुळे अकोला लोकसभा काँग्रेस चे उमेदवार हिदायतउल्ला खाँ पटेल सह त्यांचे गटाने राग धरून त्यांची पवित्र रमजान महिण्यात निघृण हत्या केली होती.
भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे प्रदेश अध्य्क्ष तथा अध्य्क्ष हज कमेटी राज्यमंत्री दर्जाचे मा ना जमाल सिद्दीकी २६ में रोजी मृतक मतीन खाँ पटेल यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन नंतर अकोट येथे विश्राम गृहात स्थानिक पोलीस अधिका-यांसोबत चर्चा करून ४ दिवसात आरोपींना तत्काळ अटक करा असल्याचे कड़क सुचना दिल्या होत्या. त्या सुचनाची अंमलबजावणी ना करता या हत्याच्या घटनेपासून आरोपींना अटक का करत नाही नुसता नावासाठी ३ पोलीस पथक गठीत करून आतापर्यंत जवळपास २८ दिवस झाले असून हिदायतउल्ला खाँ पटेल गटाचे 5 आरोपींना पोलीस अटक करण्यास दिरंगाई करत आहे व भाजपा अल्पसंख्यक मोर्चा अकोला जिल्ह्याचे वतीने अकोला जिल्हा पोलिस अधिक्षकांकड़े आरोपींना अटक करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यावर आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे आश्वासन सुध्दा दिले होते. इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ करत आहे.
तसेच हिदायतउल्ला खाँ पटेल यांना राजकीय नेत्यांनी व पोलिसांचे सहकार्याने शेवटी १९ जुनला अटकपूर्वक जामिन मिळाली आहे आणि मृतक मतीन खाँ पटेल यांच्या कुटुंबियांचे जाणून बुजुन बयान सुध्दा घेतले नाही. हा आमच्यावर मोठा अन्याय झाला आहे. तसेच हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्या गटाकडून मृतक मतीन खाँ पटेल यांच्या कुटुंबाला वारंवार धमक्या देत असून या प्रकरण आपसात करा नाही तर आम्ही तुमच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करणार आहोत अश्या प्रकारचे धमक्या मिळत आहे. म्हणून आमच्या कुटुंबियांना त्यांच्या लोकांपासून जीवाला धोका निर्माण झाला आहे व त्यांच्या विरोधात लवकरच नागपुर खंडपीठात याचिका दाखल करणार आहोत. शेवटी आम्हाला न्याय व्यवस्तेवर पूर्णपणे विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे. तसेच १ जुलै ला भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे प्रदेश अध्य्क्ष तथा अध्य्क्ष हज कमेटी राज्यमंत्री दर्जाचे मा ना जमाल सिद्दीकी हे मृतक मतीन खाँ पटेल यांच्या कुटुंबियांसोबत शिवाजी चौक येथे तो पर्यंत पूर्ण आरोपी अटक करत तो पर्यंत आम्ही बेमुदत धरना आंदोलन करणार आहे अशी माहिती मृतक मतीन खाँ पटेल यांच्या कुटुंबियांनी एका पत्रव्दारे कळविले आहे.
अधिक वाचा : वा. सी. बेद्रे इतिहास अकादमी प्रदेश अध्यक्ष पदी डाॅ.रामभाऊ मुटकुळे तर महासचिव पदी संघर्ष सावरकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola