बाळापूर (शाम बहुरूपे) : शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे, शिवसेना अकोला जिल्हा संपर्कप्रमुख केंद्रीय अवजड व सार्वजनिक उपक्रम मंत्री मा. ना. अरविंदजी सावंत साहेब यांच्या आदेशाने शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह बाळापूर येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत तालुक्यात प्रभागनिहाय शाखाप्रमुख नेमणूक करावया संबंधित माहिती तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना देताना जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख सोबत उपजिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर उपस्थित होते.
या बैठकीला तालुक्यातील तसेच शहरातील बाळापूर तालुका प्रमुख संजयभाऊ शेळके, माजी तालुका प्रमुख उमेश आप्पा भुसारी, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष करणसिंह ठाकूर, शिवसेना शहरप्रमुख आनंद बनचरे, युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, शिवसेना उपतालुकाप्रमुख नितीन मानकर, दत्ताभाऊ मानकर, गोपाळ वाकोडे, संभाजी भरणे, विठ्ठल माळी, गोपाळ होनाले, दीपक घोगरे, विजय धर्माले, ऋषीकेश वाकोडे, दत्ता भरणे, शुभम जोध, देवर्षी देशमुख, गणेश भिसे, खुशाल क्षीरसागर, मनोज खनसरे, आकाश हिरळकर, संतोष आगरकर अजय करणकार, गणेश प्रजापती, आदी पदाधिकारी, बुथप्रमुख उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola