अकोला (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षकांच्या जुन्या पेंशनसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणसाठी बसलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी तब्येत खालावली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज टमिर्नस नजिकच्या सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान देखील त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा कणही घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संगीता शिंदे यांच्या आंदोलनावरून शुक्रवारी विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी देखील झाली असून त्यामुळे राज्य सरकारसमोर देखील मोठा पेच या आंदोलनामुळे निर्माण झाला आहे. आजही हजारो शिक्षक आझाद मैदानावरील आंदोलनात बसलेले असून ते सरकारकडे न्यायाची मागणी करत आहेत. अमरावती विभागातील हजारो शिक्षक सध्या या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात दररोज हजारो शिक्षक सहभागी होत असून आंदोलन गेल्या ५ दिववसांपासून सुरूच आहे. या आंदेालनात उपोषणासाठी बसलेल्या शिक्षकांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यामध्ये संगीता शिंदे यांनी स्वत: शिक्षकांसाठी उपोषण सुरू केले असून त्यांची तब्येत खालावत चालल्याने सरकारचे देखील धाबे दणाणले आहेत.
शुक्रवारी सकाळी संगीता शिंदे यांची अचानक तब्येत खराब झाल्याने त्यांना सुरूवातीला जे.पी.हॉस्पीटलमध्ये चेकअपसाठी पोलिस घेऊन गेले. त्यानंतर त्या आंदोलनाकडे परतत असताना त्यांना शिक्षणमंत्री शेलार यांनी विधानभवन परिसरात चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांना विधानभवन परिसरात अचानक भूरळ आल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना लगेच सीएसटी नजिकच्या सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कालपासून त्यांच्यावर उपचार असून त्यांचे उपोषण मात्र अद्यापही सुरूच आहे.
विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
काँग्रेसचे गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी जुन्या पेंशनसाठी शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनाला त्रास देण्याचा प्रकार पोलिसांकडून करण्यात येत असून पोलिसांच्या मनमर्जीवर लगाम घालण्याची मागणी केली. तसेच २००५ पूर्वी सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी लाऊन धरली. यावेळी आ.विरेंद्र जगताप यांनी देखील शिंदे यांच्या आंदोलनाचे समर्थन करत शिक्षकांना न्याय देण्याची मागणी लावून धरली आहे.
पर्यावरणमंत्र्यांनी केली मध्यस्थी
शिक्षकांच्या आंदोलनावरून प्रश्न चिघळत असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मधस्थी करत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासीत केले. तोपर्यंत विरोधक सभापतींच्या बाकासमोर एकत्रित येऊन सरकारवर ताशेरे ओढत होते.
आंदोलन सुरूच राहणार
२००५ पूर्वी नियुक्ती होऊन देखील अनेक शिक्षक पेंशनपासून वंचित ठरले असून त्यांच्या कुटूंबावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. शिक्षकांप्रती सरकारची उदासीनता खपवून घेतली जाणार नसून शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत आपण उपोषण कायम ठेवणार असल्याचे संगीता शिंदे यांनी हॉस्पीटलमध्ये उपचार घेताना सांगितले आहे.
अधिक वाचा : अडगाव बु येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola