अडगांव बु( दिपक रेळे) – स्थानिक भिमनगर येथील बाबासाहेब आबेडकर सभागृहात महीला बचत गटाच्या मेळाव्यास संबोधित करतांना जि.प. अकोला चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी महिलांनी बचत गटात सहभागी होऊन स्वतःचा व कुटूंबाचा विकास करावा असे आवाहन करीत मदतीसाठी नेहमी तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी महिलांना विविध योजनांची सखोल माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाला जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, माहिला बचत गटाच्या अध्यक्ष रेखा वानखडे, खिरोडकर मॅडम ग्रा.प. सदस्य सुधाकर वानखडे, संध्या देविदास सावळे, विनोद वानखडे, मिलिंद वानखडे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार किशोर कोल्हे यांनी मानले. याप्रसंगी महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
अधिक वाचा : चार वर्षांमध्ये 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola