हिवरखेड(दिपक रेळे) -हिवरखेड येथील पाणीपुरवठा मागील वर्षीच्या उन्हाळ्यात अनेक दिवस बंद असल्याकारणाने हिवरखेड येथील ग्रामपंचायत वर नागरिकांनी मोर्चा काढला होता.
त्यावेळी तेथे सरपंच व ग्रामसेवक हजर नसल्याने उपस्थितांपैकी काही जणांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. त्यावेळी जवळपास तासभर ग्रामपंचायत कर्मचारी आतच कोंडल्या गेले होते. सदर प्रकरणी एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने त्यावेळी विरोधी पक्षात असणारे सुरेश ओंकारे, रविंद्र वाकोडे, अजीज खा, हिफाजत खा या चार ग्रामपंचायत सदस्य व काही नागरिकांच्या विरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशन मधे फिर्याद दिली होती. मात्र त्यानंतर त्याच कर्मचाऱ्याने प्रतिज्ञापत्र देऊन फिर्याद मागे घेतली. त्यावर तालुका न्यायालयाने सुद्धा गुन्हा खारीज केल्याचा निर्णय दिला. पण ग्रामपंचायतला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडण्याच्या घटनेचा आधार घेऊन तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे सह त्या वेळी सत्तेत असनाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांनी त्यावेळी विरोधी गटात असणाऱ्या सुरेश ओंकारे, रवींद्र वाकोडे, अजीज खा, हिफाजत खा यांच्या विरुद्ध पदाचा दुरुपयोग करण्याच्या आरोपाखाली कार्यवाही करण्यासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर विभागीय आयुक्तांनी चारही सदस्यांना ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) प्रमाणे 6 जून 2019 रोजी अपात्र केले होते.
पण आयुक्तांच्या या अपात्र करण्याच्या निर्णया विरोधात या चारही ग्रामपंचायत सदस्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दी 18 जून 2019 रोजी अपात्रतेला स्थगनादेश दिल्यामुळे चारही सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद कायम झाले आहेत. या प्रकरणी त्या चार अर्जदार ग्रामपंचायत सदस्यांची बाजू ॲडव्होकेट राम पाटील कोरडे यांनी तर गैरअर्जदार यांची बाजू ॲडव्होकेट संदीप चोपडे यांनी मांडली.
हिवरखेड नगरपंचायत घोषित करून हा खेळखंडोबा बंद करावा
हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये अत्यंत चढाओढीचे राजकारण असून मागील काही वर्षांपासून येथे पाच वर्षाच्या आत अनेकदा सरपंच बदलण्याची प्रथाच पडली आहे. मागील काही काळापासून विविध गटातटात एकमेकांविरोधात तक्रारीं करण्याचा महापूर आला असून अनेक सदस्य कधी पात्र तर कधी अपात्र तर कधी अपील तर कधी स्थगिती अशा नियमित घडामोडी सुरू आहेत. ह्या सर्व विवादांचा मात्र हिवरखेड च्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतरण करून शासनाने हा खेळखंडोबा तात्काळ बंद करावा. अशी मागणी हिवरखेडच्या सामान्य नागरिकांकडून होत आहे. नगरपंचायत या मुद्द्यावर अनेक राजकारण्यांनी निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या परंतु अनेकांना राजकीय समीकरनाचे गणित लक्षात ठेवून जाणीवपूर्वक या मागणीचा विसर पडला आहे. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन सुरू असून या शेवटच्या अधिवेशनात तरी हा मुद्दा मार्गी लावावा. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी व सीईओ यांनी गाठला हिवरखेडचा सरकारी दवाखाना, गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी केली चौकशी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola