बाळापूर (डॉ शेख चांद) : दिनांक 15।6।19 रोजी बाळापूर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील व्याला गावात छाया दिलीप गवई नामक महिलेचे प्रेत तिचे घरात आढळून आले होते, घराचे सर्व दरवाजे आतून बंद असल्याने व महिलेच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून न आल्या मुळे पोलीस चक्रावले होते, शव विच्छेदन केल्या नंतर सुद्धा मृत्यूचे कारण समोर न आल्या मुळे पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली होती.
परंतु पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, ह्यांचे मार्गदर्शनाखाली बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मोरे व कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहिती व साक्षीदारांच्या माहिती वरून तसेच मृतक चे नातेवाईक ह्यांनी दिलेल्या माहिती वरून व्याला येथील अनिल रघुनाथ वानखेडे ह्याचे वर नमूद महिलेला विषारी पावडर लिंबू पाण्या मध्ये मिसळवून तिला पिण्यास देऊन त्या नंतर तिला बळजबरीने पाजून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नमूद मृतक महिलेचे आरोपी सोबत संबध होते व ती आरोपीला मंजूर झालेल्या घरकुला मध्ये हिस्सा मागत होती व नेहमी आरोपीला तसेच त्याचे कुटुंबियाला शिवीगाळ करीत होती ह्या रागातून हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केले, ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.
अधिक वाचा : अकोला एम.आय.डी.सी तिल श्री अरिहंत कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवा – कॉ. रमेश गायकवाड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola