अकोला(प्रतिनिधी)– महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या विद्युत भवनात कार्यरत कर्तव्यनिष्ठ जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात बदली झाली असून लवकर ते पदभार सांभाळणार आहेत. नोव्हेंबर २०१३ ते जून २०१९ पर्यंतच्या साडेसहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी महावितरणची प्रतिमा जनसामान्यांमध्ये, वीज ग्राहकांमध्ये उंचाविण्याचे भरीव कार्ये केले आहे.
अकोला परिमंडळातील सर्वच मंडळामध्ये व तत्कालीन अमरावती परिमंडळामध्ये या कार्यकाळात त्यांनी ग्राहकांसाठी असलेल्या विविध सेवा,योजना,सकारात्मक कार्ये, यांची माहिती ग्राहकापर्यंत विविध माध्यमाद्वारे सातत्त्याने दिली. यासोबतच शहरी/ग्रामीण क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या अडचणी, तक्रारी व शंका नियमितपणे व्यवस्थापनापर्यंत पोहचवून ते वरिष्ठांच्या मदतीने सोडविण्याकरिता प्रयत्न केले. यासाठी विविध उपक्रम सातत्त्याने राबवून ग्राहकांमध्ये, महावितरणच्या कर्मचा-र्यांशी सुद्धा संवाद साधण्याचे कार्य केले आहे. यामुळे माध्यमांना आणि ग्राहकांशी कंपनीचा दुवा म्हणून भूमिका बजावली आहे.
विकास आढे यांनी माध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेवून २४/७ ते नेहमीच मदतीकरीता व संवादाकरीता उपलब्ध झाले आहे. त्यांनी दिलेल्या सकारात्मक व वस्तुनिष्ठ माहिती व वृतामुळे महावितरणची प्रतिमा आणखी उंचावण्यास नक्कीच मदत झाली आहे. अकोला येथे येण्यापूर्वी ते महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळात कार्यरत होते. महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारीतेमध्ये कार्य केले असून इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडीया यामध्ये कार्यरत होते. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद गोंदिया येथे तर जिल्हा परिषद अकोला येथे संपूर्ण स्वच्छता अभियानात माहिती शिक्षण व संवाद तज्ञपदी तसेच जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारीपदी सेवा बजावलेली आहे.
अधिक वाचा : ‘माझ वावर माझी पावर’ शेतकऱ्यांनी काय पेरावे हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्कच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola