अकोट/ तेल्हारा (दीपक रेेळे)- माझं वावर माझी पावर हे शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रता करिता शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले आहे. दिवसेन दिवस शेतीचे तुकडे करण होत आहे. दोन चार एकरात परिवाराचा उदरनिर्वाह कठीण झालेला आहे. जोवर शेती तंत्रज्ञान ची जोड मिळणार नाही तोवर शेती करणे अश्यक्य झाले आहे. तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे दार वाजवत असून शासन आम्ही ते न स्वीकारावे असा अट्टाहास करीत आहे. 2010 पासून शासनाने bt च्या चाचण्या बंद केलेल्या आहेत ती बंदी लवकर उठवून शेतकऱ्यांना जैव तंत्रज्ञानचे मार्ग शेतकऱ्यांना मिळावे या करिता दि 16 जून ला निलेश नेमाडे राहणार आडगाव बु या शेतकऱ्याने या बंदीला वाचा फोडण्याकरिता उघड HT BT मी माझ्या शेतात लावणार हे ठरविले आहे. 10 जून येथे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बाहाळे यांनी सर्वप्रथम अकोली जहागीर येथे तंत्रज्ञान स्वतंत्र भंडारा घेऊन या आंदोलनांची सुरवात केली. याला गावागावात समर्थन मिळत असून या आंदोलनात शेतकरी स्वतःहून सहभाग नोंदवत आहे. निलेश नेमाडे हे शेतकरी संघटना युवा आघाडी तालुका तेल्हाराचे अध्यक्ष आहेत.
शेती वेवसायात बियाणांचे फार महत्व आहे. जागतिक पातळीवर शेतकऱ्यांना टिकायचे असल्यास व जगाच्या शेतकऱ्यां सोबत स्पर्धा करायची असल्यास शेतकऱ्यांना जगात मान्य असलेले जैव तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे. 2010 पासून तत्कालीन सरकारने चाचण्या बंद केल्याने शेतकरी या तंत्रज्ञान पासून वंचित राहिला आहे. म्हणून लवकर या वरील बंदी उठवून शेतकऱ्यांना हा मार्ग मोकळा करून द्यावा असं मत शेतकरी संघटना तालुका तेल्हारा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी व्यक्त केले तसेच जर शासनाने विनाकारण शेतकऱ्यांवर दबाव टाकल्यास शेतकरी संघटना प्रत्येक htbt लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.
अधिक वाचा : डॉक्टरांची गैरहजेरी आणि रुग्णवाहिका नादुरुस्त, गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola