अकोला (प्रतिनिधी) : लाच संदर्भात जाळ्यात अडकल्यानंतर पिंजर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
या घटनेत एसीबीचे कर्मचारी सचिन धात्रक हे जखमी झाले असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पिंजर पोलीस ठाण्याचे नंदकिशोर नागलकर यांंच्याविरुद्ध अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही ते ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ठाणेदार नागलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होण्याचे चिन्ह दिसताच या विभागाच्या कर्मचाºयावर स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यामध्ये सचिन धात्रक हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पिंजर येथे रवाना झालेले आहेत.
ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांची एपीआय पदावरून पीआय पदी दोन दिवसांपूर्वीच पदोन्नती मिळाली होती त्यांची बदली अकोला पोलीस प्रशिक्षण येथे बदली झाली होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola