तेल्हारा (प्रतिनिधी)- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी गावाचे मूल्यमापन करिता जिल्हास्तरीय समितीवर प्रत्येक तालुक्यातून एक पत्रकार प्रतिनिधी निवड करण्यात आली असून त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील दैनिक मातृभूमीचे प्रतिनिधी रामभाऊ दिनकरराव फाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पत्रकार संघाचे पत्रान्वये जिल्हा पोलिस अधीक्षकांनि पत्रानुसार रामभाऊ फाटकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा जिल्हा अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष रामदास वानखडे, चिटणीस विजय शिंदे, सहचिटणीस सत्यशील सावरकर, तालुका अध्यक्ष प्रल्हाद ठोकणे, सचिव सुरेश शिंगणारे, उपाध्यक्ष अनंत अहेरकर प्रा. कृष्णा फंदाट व कार्यकारिणी सदस्यांना दिले आहे.
अधिक वाचा : तंत्रज्ञान स्वातंत्र्या साठी शेतकर्यांचा एल्गार ! १० जुन रोजी तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा भोज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola