नवी दिल्लीः रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी बरेच लोक त्याचा व्हिडीओ बनवण्यात धन्यता मानतात. अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांवर पोलिसांनीही जरब बसवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहे. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला अपघात झाला असेल आणि तिला मदत करण्याऐवजी इतर व्यक्तीनं तिचा व्हिडीओ बनवल्यास पोलीस त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे.
गौतम बुद्धनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी अशा प्रकारचा गुन्हा नोंदवता येऊ शकतो का, याची चाचपणी केली. यासाठी ट्रॅफिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेणार असून, अशा प्रकारे कोणताही वाहन चालक दुसऱ्या अपघातग्रस्त व्यक्तीचा व्हिडीओ बनवत असल्याचं निदर्शनास आल्यास त्या वाहन चालकाची ओळख पटवली जाणार आहे. नंतर त्या वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
रस्त्यावरील अशा बऱ्याच अपघातात रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अपघात झाल्यानंतर उपस्थित लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा व्हिडीओ काढण्यात मश्गुल असतात. त्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कोणीही पुढे जात नाही किंवा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करत नाहीत. त्यामुळे जास्त करून जखमी व्यक्तीचा मृत्यू होतो.
अधिक वाचा : कर्ज आणखी स्वस्त होणार, रेपो दरात कपात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola