बोर्ड़ी(देवानंद खिरकर)– अकोट तालुक्यातील बोर्ड़ी ,शिवपुर,अमोना, या तिन गावांना टैकरने पानी पुरवठा करण्याचा उपविभगिय अधिकारी रामदास सिध्दभट्टी अकोट यांनि नुकताच आदेश दिला होता. अकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावात टैकरने पानी पुरवठा करन्याची उपाययोजना करण्यात आली आहे.विशेष म्हणजे अकोट तालुक्यात प्रथमच टैकरने पानीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या रखरखते ऊन, भूगर्भात खोलवर गेलेली पाण्याची पातळी व दुष्काळी स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची टंचाई काहि गावामधे निर्माण झाली आहे.
त्यामूळे पानी टंचाई निवारणार्थ टंचाईग्रस्त गावात टैकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करन्यात आला होता.परंतू जिल्ह्यामधे सध्यास्थितीत शासकिय टैकर उपलब्ध नसल्यामुळे खाजगी टैकर धारक करारनाम्यातील मान्य दराने भाड्याने घेऊन टैकर पानी पुरवठा करन्याबाबतचे आदेश हैद्राबाद येथिल खाजगी टैकर धारक यांना दिले आहेत. तरी बोर्ड़ी मधे टैकरने पानी पुरवठा सुरु झालेला आहे. याकरिता जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोन्द्रे हे सतत प्रयन्तशील होते. अखेर त्यांच्या प्रयतनांना मिळाले यश तरी बोर्ड़ी गावला टैकरने पाणी पुरवठा सुरु झालामुळे सर्व गावकरी लोकात आनंदाचे वातवरण झाले आहे. तसेच पुर्ण बोर्ड़ी ग्रामवासीयांनी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेबजी बोन्द्रे यांचे आभार मानले आहे.
अधिक वाचा : वाडेगावातील नागरिकांच्या सहभागातून निर्गुणा नदी खोलीकरणाला सुरुवात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola