• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड येथील सार्वजनिक शौचालय महिलांसाठी ठरत आहेत जीवघेणे,प्रशासन मात्र सुस्थ

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
हिवरखेड येथील सार्वजनिक शौचालय महिलांसाठी ठरत आहेत जीवघेणे,प्रशासन मात्र सुस्थ
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (दिपक रेळे)– काही चांगले अपवाद वगळता शासकीय कामे किती निकृष्ट दर्जाची असतात याचे पावलोपावली अनुभव हिवरखेड वासियांना येत आहेत. निकृष्ट बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येण्याच्या लग्ना हिवरखेड मध्ये वाढीस लागल्या आहेत.

हिवरखेड ते काही वर्षांआधीच फत्तेपुरी संस्थान जवळ पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक महिला शौचालयांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यातल्या त्यात सन 2016 मध्येच जवळपास पावणे दोन लक्ष रूपये ह्या शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आले होते हे उल्लेखनीय.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

दि 5 जून रोजी दुपारी आशाबाई विठ्ठल डिगे ह्या वृद्ध महिला शौचालयात गेल्या असता त्या शौचालयाच्या शीट आणि टाइल्स सगट शौचालयाचा मैला साचणाऱ्या घाणटाक्यात कोसळल्या. मानेच्या वरचा भाग वगळता त्या पूर्णपणे घाणीत बुडाल्यामुळे प्रचंड घाबरल्या. सदर शौचालयांमध्ये नेहमी प्रचंड घाण, दुर्गंधी, अस्वच्छता राहत असल्याने आशाबाईंनी शौचालयात जाण्याआधी तोंडाला लुगडे बांधले होते त्यामुळे घाणटाक्यात बुडाल्यानंतर त्यांना मोठ्याने ओरडणे ही शक्य झाले नाही. दुपारची वेळ असल्याने उन्हामुळे कोणीही हजर नव्हते. परंतु सुदैवाने तेथून जाणाऱ्या विठ्ठल रामकृष्‍ण अढाऊ या युवकाला ही बाब लक्षात आल्याने त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आशाबाईंना घाण टाक्याच्या बाहेर काढले. त्यामुळे आशाबाई यांचे प्राण वाचले. पण त्यांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि कमरेला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला. त्यातच त्यांचे कष्टाचे चारशे रुपये पडले आणि कपडेही निकामी झाले. ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसरली आणि अनेक लोकं तेथे हजर झाले परंतु आशाबाईंना दवाखान्यात उपचारासाठी देण्याचे सौजन्य कोणी दाखविले नाही.

हि पहिलीच घटना नसून ह्याच शौचालयामधील दुसरे युनिटमध्ये मागच्या वर्षी अशाच प्रकारे बेबीबाई बाळू पातोळे हि महिला संडासच्या शीटसह घाण टाक्यात अशाच प्रकारे कोसळली होती. त्यावेळी अनेक महिलांनी मिळून त्यांना वाचविले. त्या महिलेच्या मोडलेल्या हाताचा त्रास अजूनही कायम आहे. त्यावेळी अनेक ग्रा प सदस्यांनी ह्या शौचालयाच्या चौकशीबाबत जिल्हाधिकारी यांचेसह अनेक वरिष्ठांना निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. पण नंतर काहीही नाही. वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई केली असती तर ह्या संतापजनक घटनेची पुनरावृत्ती झाली नसती. दोन वेळा संडास शीटसह महिला बुडण्याच्या घटनेला कोण जबाबदार आहेत की ती महिला शौचालयात जाऊन पडल्याने ती स्वतःच जबाबदार आहे काय??? असा संतप्त सवाल जनता करीत आहे.

प्रतिक्रिया
आमच्या कार्यकाळात शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले होते ते काम पूर्ण नियमानुसार झाले असेल ह्याची संपूर्ण चौकशी करूनच इंजिनीयर ने एम.बी.सी.सी. केली असेल त्यानंतरच बिल काढण्यात आले.
सौ. प्रतिभाताई विरेंद्र येऊल तत्कालीन सरपंच हिवरखेड.

आम्ही शौचालय दुरुस्तीच्या चौकशीबाबत वरिष्ठांना अनेक निवेदने दिली. परंतु काहीही कारवाई झाली नाही त्यामुळे दोषींवर कार्यवाही व्हावी.
रविंद्र वाकोडे ग्रा प सदस्य वॉर्ड क्र 2 हिवरखेड.

अधिक वाचा : मंत्री महोदयांनो इकडे ही लक्ष द्याल काय? दोन्ही मंत्र्यांनी PMO चे निर्देश पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा – हिवरखेड वासीयांची मागणी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला शहर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरले,रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर एकाची हत्या

Next Post

अकोट तालुक्यातील बोर्ड़ी येथे टँकरद्वारे पानीपुरवठा सुरु

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोट तालुक्यातील बोर्ड़ी येथे टँकरद्वारे पानीपुरवठा सुरु

अकोट तालुक्यातील बोर्ड़ी येथे टँकरद्वारे पानीपुरवठा सुरु

अकोला

मदत न करता अपघाताचे चित्रीकरण करणाऱ्यांवर आता होणार कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.