अकोट (प्रतिनिधी)– अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या भागातील शेत शिवारात एका विहिरीमध्ये दांपत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. ही घटना 31 मे रोजी सकाळी उघडकीस आली.
घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेतली आहे. अकोट तालुका दुष्काळ घोषित झाला आहे. अशा स्थितीत इंधन आणण्याकरीता समाधान वारुळे व बेबीताई वारुळे हे दोघे पती-पत्नी 30 मे रोजी सकाळपासून शेत शिवारात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही.
अधिक वाचा : बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola