अकोट(देवानंद खिरकर)-काल जाहिर झालेल्या बारावीच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या धक्का सहन न झाल्याने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी गजानन सलामे राहणार प्रिप्री खुर्द वय 18 वर्ष या युवतीने घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना निकालाच्याच दिवशी घडली.
मृतक अश्विनी हिला बारावीमधे 650 पैकी 361 गुण मिळाले पन या गुणावर तिचे समाधान झाले नाही. तीला यापेक्षा ज्यास्त गुणाची अपेक्षा होती.निकाल कळला त्यावेळी तिच्या घरी पाहुणे होते पाहुण्यासोबत तिने जेवन सुधा केले. घरातील पाहुणे गेल्यावर तिने दुपारी 4 वाजताच्या दरम्यान साडीने बंद खोलीत गळफास घेतला.घरातील लोकांच्या लक्षात आल्यावर तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवीले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अश्विनी हिने आत्महत्या केल्यामुळे प्रिप्री खुर्द गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : अकोटच्या नेत्रहीन धनश्रीचे बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola